Posts

Showing posts from September, 2026

मोबाईल मला नको आई, मला मोठ्ठं व्हायचंय... | ARJ Sir, Daund

प्रिय आई-बाबा, सप्रेम नमस्कार! आई, आज मला तुला आणि बाबांना एक गोष्ट मनापासून सांगायची आहे... “मोबाईल मला नको आई, मला मोठ्ठं व्हायचंय...” हो आई, मला मोबाईल नकोय. मला त्यात सतत गुंतून राहायचं नाही. कारण मला भीती वाटते की, हळूहळू त्यात इतका गुंतून जाईन की माझं डोकं चालणं थांबेल, विचार करण्याची सवय कमी होईल आणि माझ्या स्वप्नांची वाटच हरवून जाईल. आई, मला मोठं व्हायचंय... फक्त उंचीने नाही, तर विचारांनी मोठं व्हायचंय. ज्ञानाने मोठं व्हायचंय. चांगला माणूस म्हणून मोठं व्हायचंय. मला मोबाईलच्या छोट्याशा स्क्रीनमध्ये माझं मोठं जग बंदिस्त करायचं नाही. मला पुस्तकांच्या पानांतून जग पाहायचंय. मला मैदानावर धावायचंय, खेळायचंय, पडायचंय आणि पुन्हा उठायचंय. मला मित्रांसोबत मनमोकळं हसायचंय. मला आजी-आजोबांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत. मला तुमच्यासोबत बसून गप्पा मारायच्या आहेत. आई-बाबा, तुम्ही माझ्या हातात मोबाईल देऊन मला शांत करू शकता; पण माझ्या मनाला आनंद देण्यासाठी तुमचा वेळ आणि तुमचं प्रेमच मला हवं आहे. कधी कधी मला मोबाईल द्यावासा वाटेल, कधी मी हट्टही करेन. पण त्या वेळी मला माझा हट्ट पूर...